शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आंतरराज्य टोळीतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:45 PM

उत्तर प्रदेशातून येऊन अश्विननगर भागात घरफोडी करण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला. नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्याला पकडले, तर इतर तीन आरोपी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबड पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ठळक मुद्देसिडको परिसर : अश्विननगरमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला

सिडको : उत्तर प्रदेशातून येऊन अश्विननगर भागात घरफोडी करण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला. नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्याला पकडले, तर इतर तीन आरोपी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबड पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिडकोतील अश्विननगर भागातील गायत्री अपार्टमेंट येथे सुप्रिया नीलेश ठाकूर (४०) या राहतात. शनिवारी (दि.१८) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास त्या घराला कुलूप लावून खासगी कामासाठी पेलिकन पार्ककडे गेल्या. यादरम्यान घरफोडी करणारा आरोपी वसीम नसीम शेख (वय २४, रा. हापूर, उत्तर प्रदेश) याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला.यानंतर पंधरा मिनिटांत काम आटपून सुप्रिया ठाकूर घरी आल्या तर घराचा दरवाजा उघडा पाहून त्यांनी घरात कोण आहे, अशी आरोळी मारली, यावेळी घरात असलेला शेख बाहेर आला व पळू लागला, यावेळी ठाकूर यांनी चोराला पकडा अशा ओरडल्या, यानंतर परिसरातील नागरिक व पोलिसांना माहिती मिळालयाने पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे, अवि देवरे, भास्कर मल्ले, दीपक वाणी, प्रमोद काशीद घटनास्थळी आले. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणाऱ्या शेख या चोरट्याला पकडले. ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरटा वसीम शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शेख याच्यासमवेत तीन जण होते. त्यांच्याकडे कार असून, ते घरफोडी करण्यासाठी नाशकात आले असल्याची माहिती शेख याने पोलिसांना दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी