इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

By Admin | Updated: July 28, 2014 23:28 IST2014-07-28T22:35:07+5:302014-07-28T23:28:04+5:30

इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

Integrity message from Iftar party | इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित इफ्तार पार्टीला तालुक्यातील विविध धर्मीयांच्या समाजबांधवांनी उपस्थितीत राहून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला गेला.
घोटी शहरातील शाही मस्जिद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळाचे सावट दूर होऊन जिल्ह्यात पाऊस पडावा, असे सामूहिक दुआ पठण यानिमित्ताने करण्यात आले. रोजा इफ्तार झाल्यानंतर मौलाना मोहम्मद कासम यांनी नमाज पठण केले. त्यानंतर सर्व रोजेदार व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी विविध धर्मीय पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उदय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव, संजय जाधव, लाभेश हांडे, मुश्ताक पानसरे, शांताराम निंबेकर, सतीश पवार, नितीन भालेराव, इम्तियाज सय्यद, आबू सय्यद, अजीम पानसरे, फय्याज ठक्कर, अल्ताफ डॉन, अल्ताफ सय्यद, जावेद शेख, डॉ.युनूस रंगरेज, उमर खान, नईम खान, शोकत सय्यद, मुज्जफ्फर रंगरेज आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Integrity message from Iftar party