शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

मधल्या बोटावर शाई : आचारसंहिता जारी

By admin | Updated: October 27, 2014 23:54 IST

७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा धुरळा बसत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील डिसेंबरमध्ये मुदत संपत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील ७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मतदारांनी नुकतेच विधानसभा निवडणुकीत मतदान केले असल्याने ग्रामपंचायतीसाठी डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्याची सूचना आयोगाने केली आहे. सोमवारी या निवडणुकीची घोषणा करून त्या-त्या ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये ज्यांची मुदत संपुष्टात येत आहे अशा ग्रामपंचायतींबरोबरच ज्या ग्रामपंचायतींच्या जागा काही कारणास्तव रिक्त झाल्या आहेत अशा ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्ह्णातील नाशिक, नांदगाव, येवला, निफाड, कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव या आठ तालुक्यांतील सुमारे ७० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, ३ ते ८ नोव्हेंबरदरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. १० रोजी छाननी, १२ नोव्हेंबर रोजी माघार व २३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजे २४ रोजी मतमोजणी करण्यात येईल. अलीकडेच विधानसभा निवडणूक पार पडली असून, सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. गावेच्या गावे राजकारणात उतरल्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकारण रंगणार आहे. मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याची पद्धत असली, तरी अलीकडेच विधानसभा निवडणुकीत केलेल्या मतदानाची शाई ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे तर्जनीच्या शेजारील मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी, अशा सूचना आयोगाने सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.