शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांची शोध मोहीम सुरूज

By admin | Updated: October 9, 2015 23:09 IST

खमी जोंधळे यांची प्रकृती स्थिर

पंचवटी : दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या बी-बियाणे व्यापाऱ्यावर हल्ला चढवून गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमाराला धात्रकफाटा परिसरात घडली होती. या घटनेतील संशयितांच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या नीलेश जोंधळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, धात्रकफाटा परिसरातील एका हॉटेलबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, त्या कॅमेऱ्यात संशयित दिसतात का याचे फुटेज तपासणी तसेच जोंधळे यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले कॉल्स रेकॉर्ड तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. धात्रकफाट्यावरील योगेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या जोंधळे यांचे धात्रकफाटा परिसरात जोंधळे कृषी उद्योग नावाचे दुकान असून, गुरुवारी रात्री ते दुकान बंद करून घराकडे आले असता इमारतीच्या वाहनतळात दोघा संशयितांनी त्यांच्याशी झटापट करून गोळीबार केला होता या घटनेत जखमी झालेल्या जोंधळे यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या पत्नी व इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खाली धाव घेतली असता जोंधळे जखमी झाल्याचे दिसून आले होते त्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना उपचारार्थ जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने इमारतीची तपासणी केली असता एका दुचाकीच्या चाकाजवळ काडतूस मिळाले होते. जोंधळे यांच्यावर पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरूनच हा गोळीबार झाला असावा, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)