शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासाभिमुख शिक्षणाची गरज

By admin | Updated: February 21, 2017 01:31 IST

अनिल काकोडकर : गोखले एज्युकेशनच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : सध्या विकेंद्रित होत असलेल्या उद्योगांचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाच्या साह्याने ग्रामीण भागात एकत्रीकरण करून शहर व ग्रामीण आणि गरीब, श्रीमंतीची दरी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना औद्योगिक विकासाभिमुख शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गोपाळकृष्ण गोखले यांचे १५१ वे जयंती वर्ष, गोखले एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन व डॉ. एम. एस. गोसावी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जैन विश्व विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. सुधामाही रेगुनाथन, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ शंकरराव गोवारीकर, प्राचार्य एस. बी. पंडीत, एचएएलचे महाव्यवस्थापक डॉ. बी. एच. व्ही. शेषगिरीराव, डॉ. जी. पी. पानसे, एस. टी. देशमुख, आर. जे. गुजराथी प्रा. बी. देवराज आदि उपस्थित होते. काकोडकर म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागात दरडोई उपन्न निम्म्याहूनही कमी आहे. ग्रामीण भागात ५० टक्के कु टुंबांकडे शेती असल्याचा समज असला तरी प्रत्येक्षात शेतीवर उदरनिर्वाह भागवू शकतील, असे केवळ ३० टक्के कुटुंब आहे. उर्वरित बहुतेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन रोजंदारी आहे. त्यामुळे या वर्गासाठी ग्रामीण भागात औद्योगिक विकास होणे गरजेचे असून, येथील तरुणांना ते उद्योग व्यवसाय करू शकतील, असे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचे काकोडकर म्हणाले. दरम्यान, डॉ. एम. एस. गोसावी यांचा काकोडकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, उद्योजक अतुल चांडक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर व डॉ. विजय गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेला ५० लाख रुपयांची देणगी मिळाली. प्रास्ताविक दीप्ती देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी पेठकर, प्रा. मुग्धा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)