शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मरची... ४ मेरोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
4
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
5
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
6
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
7
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
8
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
9
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
10
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
11
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
12
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
13
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
14
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
15
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
16
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
17
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
18
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
19
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
20
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

By admin | Updated: September 16, 2014 00:22 IST

‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

 

मालेगावअपक्ष विजय संपादन केल्यानंतर उपसभापति-पदाचा मान तोही सलग दुसऱ्यांदा मिळविण्याची किमया साधली आहे निमगाव गणाच्या सदस्य अनिता दीपक अहिरे यांनी. पक्षातर्फे निवडणूक जिंकूनही अनेकांना मानाच्या पदांपासून वंचित रहावे लागले असल्याचे चित्र मालेगाव पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडणुकीत आज दिसून आले.निवडणुकीत एक एक मताला कशी किंमत असते त्या मतांचे मोल काय असते याचा प्रत्यय नवनिर्वाचित उपसभापती सौ. अहिरे यांनी आज आणून दिला. गत अडीच वर्षापूर्वी निमगाव गणातून अपक्ष उमेदवारी करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या निर्मला मधुकर हिरे या बलाढ्य व प्रस्थापित उमेदवाराचा पराभव करीत अहिरे प्रथमच विजयी होत तालुक्याच्या राजकारणात नवा इतिहास घडविला होता. या जोरावर त्यांनी उपसभापतिपद पटकाविले होते. एका सामान्य कुटुंबातील स्त्रीला हा बहुमान मिळाला होता.मात्र राजकारणात जशी संधी येईल त्याचे सोने जो करेल तोच सत्ता मिळवेल. याचा प्रत्यय सौ. अहिरे समर्थकांनी याही निवडणुकीत आणून दिला. शिवसेनेकडे असलेले सात सदस्यांचे संख्याबळ व विरोधकांकडे असलेले सहा मतदार यात अपक्ष असलेल्या सौ. अहिरे यांच्या मताला मोठा भाव आला. सत्ताधारी शिवसेनेने आपल्याकडेच सत्ता ठेवण्याचा चंग बांधला होता. सौ. अहिरे यांना पुन्हा उपसभापतिपदाची उमेदवारी देत त्यांना विजयी केले व तालुक्यात सलग दुसऱ्यांदा उपसभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. ३२ वर्षी सौ. अहिरे या निमगाव येथील समता परिषदेचे तरुण कार्यकर्ते दीपक अहिरे यांच्या सुविद्य पत्नी.