कांद्याचा वाढला भाव

By संजय दुनबळे | Published: September 9, 2020 01:13 AM2020-09-09T01:13:38+5:302020-09-09T01:14:11+5:30

सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Increased prices of onions | कांद्याचा वाढला भाव

कांद्याचा वाढला भाव

Next
ठळक मुद्देदक्षिणेतील राज्यात नुकसान : नवीन पीक येईपर्यंत स्थिती कायम राहाणार

नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दक्षिण भारतात सुमारे ४२ टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असून, तेथून होणारी आवक कमी झाली आहे. याशिवाय यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे तोही आता सडू लागला आहे.
पोळ कांद्याची ज्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात झालेली नाही. महाराष्टÑात कांदा साठवणुकीची परंपरा असल्यामुळे सध्या महाराष्टÑातील शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा शिल्लक आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे कांद्याचे दर वाढले असून, यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Increased prices of onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.