लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय

By Admin | Updated: September 6, 2016 22:55 IST2016-09-06T22:54:56+5:302016-09-06T22:55:09+5:30

लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय

Inconvenience due to closure of Lasalgaon-Pune bus | लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय

लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय


पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी मार्गे जाणारी लासलगाव-पुणे बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून सदर बस पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
लासलगाव आगाराने एक एप्रिलपासून लासलगाव, विंचूर, खेडलेझुंगे, सोमठाणे, पंचाळे, पांगरी, मऱ्हळ, नांदूरशिंगोटे, संगमनेर मार्गे पुणे अशी बसफेरी सुरू केली होती. या मार्गावरून धावणारी ही एकमेव बस असल्याने प्रारंभीपासूनच या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. लासलगाव व संगमनेर या दोन मोठ्या बाजारपेठा या मार्गात येत असल्याने दोन्ही गावांतील प्रवाशांना या बसचा लाभ होत होता. मधल्या मार्गाने संगमनेर व पुणे येथे कमी खर्चात जाणारी ही बस असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते.
तथापि, दोन आॅगस्टला खेडलेझुंगे येथील रस्त्याचा भरावा पुरात वाहून गेल्याने ही बस बंद करण्यात आली होती. बस बंद होऊन महिना उलटला आहे. अद्यापही सदर बस पुन्हा सुरू होत नसल्याने नाईलाजाने लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
बसचा फेरा बंद असल्याने खेडलेझुंगे, सोमठाणे, पंचाळे,
पांगरी, मऱ्हळ भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर बस पुन्हा सुरू करण्याची मागणी उत्तम
पगार, सोमनाथ पगार, युनुस कादरी, रवि पगार, संजय वारुळे, शांताराम पगार, बंडू पगार, विष्णू कलकत्ते आदिंसह प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Inconvenience due to closure of Lasalgaon-Pune bus