शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आंबेवाडी येथे बेकायदा बेसुमार वृक्षतोड

By admin | Updated: January 20, 2017 00:35 IST

आंबेवाडी येथे बेकायदा बेसुमार वृक्षतोड

 घोटी : एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि निसर्गाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षलागवडीला शासन प्राधान्य देऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’चे आवाहन करीत असताना इगतपुरी तालुक्यात मात्र शासनाच्या या उपक्रमालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे. तालुक्याच्या आदिवासी व दुर्गम भागातील वनसंपदा नष्ट करण्यासाठी लाकूडमाफियांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून, आंबेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेकडो झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून लाकूड चोरीसाठी वापरण्यात येणारा ट्रक वनविभागाने जप्त केला आहे, तर लाकूडमाफिया फरार झाला आहे.आंबेवाडी या इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीतील झाडे विनापरवाना तोडून ती चोरून नेण्याचा प्रकार लाकूडमाफियांच्या दहशतीखाली सर्रासपणे सुरू आहे. येथील देवराम पांडू सदगीर यांच्या जमिनीवरील नाशिक येथील एका लाकूडमाफियाने शेकडो झाडांची कत्तल केल्याची तसेच तोडलेले लाकडाचे ओंडके ट्रकमध्ये (क्र . एमएच ०४ बीजी ८५२) भरून चोरून नेत असल्याची बाब सदगीर यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत शेतावर जाऊन वृक्षतोडीला विरोध केला; मात्र या विरोधाला न जुमानता वृक्षतोड चालूच ठेवली. अखेर त्यांनी इगतपुरीचे वनअधिकारी रमेश ढोमसे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. त्यांनीही तत्काळ हालचाली सुरू केल्या व लाकूडचोरीसाठी वापरण्यात येणारा ट्रक मुद्देमालासह जप्त केला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड करणारा माफिया मात्र फरार झाला आहे. वनविभाग त्याचा शोध घेत आहे. याबाबत देवराम सदगीर यांनी वनविभागासह घोटी पोलिसांत तक्रार दिली आहे.(वार्ताहर)