शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सावकीत वाळूचा अवैध उपसा

By admin | Updated: November 11, 2016 23:44 IST

संताप : वाळूमाफियांवर कारवाईची मागणी

पिळकोस : देवळा तालुक्यातील सावकी येथील गिरणा नदीपात्रातून रात्रीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असून, तहसील विभाग व पोलीस प्रशासन वाळूमाफियांवर कारवाई करत नसल्यामुळे सावकी येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.आज उपसरपंच कारभारी पवार, पोलीसपाटील आश्विनी बच्छाव, अरुण शिवले, केवळ भामरे, नीलेश पाटील, राजेंद्र बच्छाव यांनी प्रत्यक्ष गिरणा नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता गिरणा नदीपात्र वाळू उपशामुळे पाच ते सात फूट खोल गेले असून, नदीत सर्वत्र खोल खड्डे झाले असल्याने सावकी गावातील शेती धोक्यात आली असल्याने वाळू उपशाला अभय देणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात सावकी येथील ग्रामस्थ, उपसरपंच कारभारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तहसीलसमोर उपोषणास बसणार असून, शिष्टमंडळ घेऊन महसूल मंत्र्यांकडे ही दाद मागणार असल्याचे सांगितले. सावकी येथील गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाबाबत सावकी गावातील सरपंच कारभारी पवार, अरुण शिवले व गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण यांनी वेळोवेळी एकत्र येऊन वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाला पकडून देऊनही देवळा महसूल विभाग वाळूमाफियांवर कारवाई करत नसून महसूल विभाग व पोलीस प्रशासन हे वाळूमाफियाना अभय देत असल्याचा आरोप सावकी ग्रामस्थांकडून केला जात आहे. (वार्ताहर)