शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

By admin | Updated: July 3, 2016 23:59 IST

इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

इगतपुरी : इगतपुरी शहर आणि परिसराला चोवीस तास मुसळधार पावसाने झोडपले .गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने गेल्या चोवीस तासात धो धो बरसात केली. आज दिवसभर इगतपुरी शहर व परिसराला चांगलेच झोडपले. पावसामुळे बाजारपेठेत दुकानदारांची धावपळ उडाली होती. यामुळे दिवसभरात बाजारात मंदी जाणवत होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. आजपर्यंत १४१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली, तर एकूण ४१४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, शहरातील रविवारचा बाजार असल्याने विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचले होतेभिजमार्केट परिसरात भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी विविध दुकानांचा आश्रय घ्यावा लागला. बुद्धविहाराजवळील जुन्या आग्रा मार्गावर गुडघ्याएवढे पाणी साचले होते. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती .शनिवारी शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थ्यांची पावसामुळे धावपळ उडाली. गेल्या दोन ते तीन दिवस मधून मधून हलक्या सरींचा पाऊस पडत होता. मात्र आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात आनंदमय वातावरण पसरले आहे.इगतपुरी शहर ते महामार्गावर धुके आज सकाळपासून इगतपुरी शहरासह कसारा घाटातील महामार्ग धुक्याने वेढला गेला होता. वाहनचालकांना भरदिवसा गाडीच्या लाईट चालू ठेवत हळूहळू मार्गक्र मण करावे लागत होते.पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात गत महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. मागील महिन्यात झालेल्या रिमझिम व एक दोन दिवस दमदार पावसानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्याला चिंता लागून राहिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त आहे असे वेधशाळेकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)