शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पतीकडून पत्नीचा कुऱ्हाडीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 9:55 PM

सटाणा : तीस वर्षीय पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी बागलाण तालुक्यातील दसाणे येथे उघडकीस आली. खून करून फरार झालेल्या पतीस पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देदसाणे : फरार पतीस शिताफीने अटक

सटाणा : तीस वर्षीय पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी बागलाण तालुक्यातील दसाणे येथे उघडकीस आली. खून करून फरार झालेल्या पतीस पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.हिरामण काळू वाघ (३६), संगीता हिरामण वाघ (३०) दोघे राहणार लोहणेर ता. देवळा हे पती -पत्नी गेल्या काही महिन्यांपासून दसाणे येथे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दोघा पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून खटके उडत होते. मंगळवारी सायंकाळी संगीता आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने तत्काळ पोलिसांना खबर देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन संगीताला उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी कुऱ्हाड जप्त केली असून कुऱ्हाडीने खून करून फरार झालेल्या हिरामणला पोलिसांनी रात्री उशिरा जामोटी येथून शिताफीने अटक केली आहे. दरम्यान, त्याने कुऱ्हाडीने संगीताची हत्या केल्याची कबुली दिली असली तरी खून करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस