शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इथं माणुसकीही ओशाळली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:39 IST

कोरोनामुळे जवळची माणसेही कशी दुरावतात आणि मरणानंतरही यातना कशी पाठ सोडत नाहीत, याचा प्रत्यत पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात नुकताच  आला. 

ठळक मुद्देमृतदेह नऊ तास घरात; कार्यकर्त्यांचा मदतीने अंत्यसंस्कार

पंचवटी : कोरोनामुळे जवळची माणसेही कशी दुरावतात आणि मरणानंतरही यातना कशी पाठ सोडत नाहीत, याचा प्रत्यत पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात नुकताच  आला. एका वृद्धेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कोणीही धजावत नसल्याने तब्बल ९ तास मृतदेह घरात पडून असल्याची बाब समोर आली आहे. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या वृद्धेच्या मृत्यूमुळे एक मुलगा, नातवंडे अक्षरशः उघड्यावर आली असल्याचे चित्र दिसून आले.मखमलाबाद नाका येथील एका इमारतीत रहिवासी सिंधू बारक पिंगळे (७१) या वृद्धे चे शनिवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. यावेळी त्यांची दोन लहान नातवंडे आणि मुलगा घरात होते. त्यांनी काही ठिकाणी फोन करून मदतीची याचना केली, मात्र कोणीही मदतीला आले नाही. मदती अभावी हतबल झालेले कुटूंबिय तसेच बसून राहीले. कोणीतरी  आपल्याला मदत करेल यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र मदत न मिळाल्यामूळे वृद्धेचा मृतदेह तब्बल ९ तास घरात पडून होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष अँड सुरेश आव्हाड यांना ही बाब कळताच आव्हाड यांच्या सह भास्करानंद गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते जय जोशी, प्रकाश हांडोरे यांनी पुढाकार घेवून अंतिमसंस्कार पार पाडले अमरधाम मधील सुनीता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. या वृध्देच्या पतीचे या आधीच करोनाने निधन झाल्याने नागरीकांनी कुटूंबियांच्या मदतीसाठीच्या याचनेकडे कानाडोळा केल्याचे समजते.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू