शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांची भरती केल्यावर कार्यकर्त्यांना शक्ती कशी लाभेल?

By किरण अग्रवाल | Updated: August 4, 2019 02:08 IST

प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाची शक्ती असतात. पण, संधी लाटून घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागल्याने भाजपतील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. ठेकेदारांनी पक्ष चालत नाही, हे खरे असेल तर अशा ठेकेदारांसाठी पायघड्या अंथरताच कशाला, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो.

ठळक मुद्देभाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न ठीकवास्तविकतेकडे दुर्लक्षच !पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित

सारांश

सत्तेची अगर यशाची गणिते जुळविण्यासाठी कधी कधी तडजोडी कराव्या लागतात व त्यास कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकलेला नाही हे खरेच; पण भरल्या पोटीही अजीर्णतेला निमंत्रण देण्यासारखी वाटचाल घडून येते तेव्हा निष्ठावानांमधील अस्वस्थता वाढून जाणे स्वाभाविक ठरून जाते. भाजपतही तेच वा तसेच होताना दिसत आहे, म्हणूनच पक्ष ठेकेदार नव्हे तर कार्यकर्तेच चालवतात, अशी पोपटपंची करून ही पक्षांतर्गत धुसफूस शमविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ या पक्षाच्या पदाधिकाºयावर आलेली पहावयास मिळाले.

भाजपच्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा नुकताच नाशकात झाला. पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला शक्ती देण्याचे कार्य या कार्यकर्त्यांना करायचे आहे, पण त्यांनी पक्षाला शक्ती मिळवून दिल्यावर सत्तेचे लाभ पदरात पाडून घ्यायला मात्र अन्य पक्षात शक्ती न उरलेले लोक भाजपत येऊ लागल्याने निष्ठावानांतच चलबिचल होताना दिसत आहे. म्हणूनच या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना ‘पक्ष ठेकेदारांच्या भरोशावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो’, असे म्हणून उपस्थितांना गोंजारावे लागले. अर्थात, सतीश जे म्हणाले त्यात गैर काहीच नाही. कोणताही पक्ष हा निष्ठावानांच्याच बळावर चालतो याबद्दल दुमत असू शकत नाही. प्रश्न असा आहे की, जर ते खरे आहे तर मग संधी व लाभासाठी परपक्षातून येणाºया ठेकेदारांना घेताच कशासाठी?


सतरंज्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून उचलून घ्यायच्या, संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या शक्तीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर लाभाचे भरलेले ताट मात्र अन्य पक्षांतून आलेल्यांच्या पुढे करायचे, या अलीकडे भाजपत प्रचलित होऊ पाहणाºया पद्धतीने निष्ठावान नाराज आहेत. यासाठी आणखी कुणाकडे पाहण्याची गरज नाही. नाशिक महापालिकेतलेच उदाहरण घ्या. तेथे सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने घाऊकपणे भरतीप्रक्रिया राबविली. कमळाचे देठ हाती धरून असे उधार-उसनवारीचे खूप लोक निवडूनही आले. त्यानंतर पालिकेतील पदे देताना या बाहेरून आलेल्यांनाच संधी दिली गेली. पक्षाच्या नादारीच्या काळात एकनिष्ठेने खस्ता खाल्लेल्यांना मात्र शुल्लक पदांसाठी पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे चपला झिजवायची वेळ आली. इतकेच काय ‘मनसे’ सोडून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनाही त्यांच्या वॉर्डातील कामे करण्यासाठी बळ दिले गेले नाही. मोजक्यांनीच आपली कामे रेटून नेलीत. म्हणजे, पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित. मग पुन्हा भरतीचा सोस कशासाठी?

नव्या लोकांना त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच प्रवेश दिला जातो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; पण अशा कर्तृत्ववानांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगर समर्थकांना पक्षकार्याला जुंपलेले दिसत नाही. त्यांना तिकीट दिले तरच त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडतात. म्हणजे व्यक्तीसाठी त्यांचा प्रचार असतो, पक्षासाठी नसतो. तेव्हा व्ही. सतीश यांचे विधान कार्यकर्त्यांना सुखावणारे असले तरी, वास्तवातील त्यांच्या अस्वस्थतेच्या कारणांकडे दुर्लक्ष करता येऊ नये.

महत्त्वाचे म्हणजे, अच्छे दिनाच्या अपेक्षेने अनेकांचा ओढा भाजपकडे असला तरी तिथे यापूर्वी प्रवेश मिळवून बाहेरचे ठरवले गेलेल्यांची अवस्था काय हे विचारातच घेतले जात नाही. ज्यांनी प्रवेशासोबतच कसली का होईना संधी किंवा तिकीट मिळवून विजयही मिळवला त्यांचे भले झाले हा अपवाद; परंतु जे प्रतीक्षेतच आहेत त्यांचे काय? आज नंबर लागेल, उद्या लागेल या आशेवर असलेले असे अनेकजण केवळ सभा-संमेलनांप्रसंगी व्यासपीठावर गौर मांडल्यासारखे बसवलेले दिसून येतात, त्यांना कुणी जमेतही धरत नाही, तरी केवळ सत्ताधारी पक्षात असल्याचे समाधान बाळगत ते थांबून आहेत. अशांकडून पक्षकार्याची अपेक्षाच करता येऊ नये. अन्यथा, भाजपत येणाऱ्यांची गर्दी होत असताना दोन वर्षांपूर्वी या पक्षात आलेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासारख्यांची शिवसेनेत घरवापसी झालीच नसती. कल्याणरावांनी दोनदा आमदारकी भूषविली, आता ते राजकारणात फारसे सक्रियही नाहीत. बरे, उमेदवारीसाठी ते शिवसेनेत आले म्हणायचे तर तिथे अगोदरच अनेक दावेदार आहेत. तरीदेखील कल्याणरावांनी भाजप सोडला. त्यांच्या या उलट प्रवाहामागील अन्वयार्थ खरे तर भाजपकडे धावणाºयांनी समजून घ्यायला हवा, पण चालत्या गाडीत बसायला इच्छुक असणारे अन्य धोके लक्षात घेत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक