शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वसुलीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट

By admin | Updated: March 31, 2017 23:25 IST

नाशिक : राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य दिले होते, घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढ झाली,

नाशिक : राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य दिले होते, परंतु ३१ मार्चअखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढ झाली, तर पाणीपट्टीत मात्र सुमारे दहा कोटींनी घट झाली आहे.  महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ११६ कोटी रुपये घरपट्टी, तर ४०.२६ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. चालू आर्थिक वर्षात महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रचंड झगडावे लागले आहे. यंदा अगोदर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, नंतर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक या कामकाजात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे कर्मचारी गुंतलेले होते. त्यामुळे महापालिकेला वसुलीत अडथळे निर्माण होत गेले. तरीही नोटाबंदीचा फायदा झाल्याने महापालिकेला त्यातून सुमारे १८ कोटी रुपये वाट्याला आले होते. त्यानंतर शासनानेच कठोर पावले उचलत घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्याचे निर्देश दिले व त्यावर आयुक्तांचा केआरए निश्चित केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्तांनी थकबाकी वसुलीसाठी अभियानच हाती घेण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, महापालिकेने ‘ढोल बजाओ मोहीम’ राबविण्यास सुरुवात केली, परंतु सुरुवातीचा उत्साह नंतर आटला आणि वसुलीही अपेक्षेपेक्षा घटली. ३१ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार घरपट्टी ९०.३७ कोटी रुपये, तर पाणीपट्टी ३० कोटी रुपये वसूल झाली. मागील वर्षी घरपट्टी ८४ कोटी, तर पाणीपट्टी ४० कोटी रुपये वसूल झाली होती. पाणीपट्टीची बिले वाटपनिवडणुकीच्या कामकाजात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कर्मचारी गुंतल्याने महापालिकेला गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून पाणीपट्टीची बिलेच वाटप करता आलेली नाही. त्यामुळे यंदा पाणीपट्टीच्या उत्पन्नात घट झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महापालिकेने आता दोन दिवसांपासून पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.