शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:19 IST

मानधनवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले. परंतु, पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने चार वाहनांच्या ३२ फेऱ्या करून आंदोलन करणाºयांना ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे तब्बल दोन तास महामार्ग बसस्थानकावर बसवून ठेवल्यानंतर सर्व आशा कर्मचाºयांना सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देआशा कर्मचाऱ्यांनी केले जेलभरो आंदोलनपोलिसांनी ताब्यात घेऊन केली सूटका अपुऱ्या यंत्रणेमुळे कारवाई लांबल्याने पावसात आंदोलन

नाशिक : मानधनवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले. परंतु, पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने चार वाहनांच्या ३२ फेऱ्या करून आंदोलन करणाºयांना ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे तब्बल दोन तास महामार्ग बसस्थानकावर बसवून ठेवल्यानंतर सर्व आशा कर्मचाºयांना सोडून देण्यात आले. राज्यात आशा व गटप्रवर्तकांचे मंगळवार (दि. ३) पासून आंदोलन सुरू असून, बुधवारपासून राज्यातील ७५ हजार आशा व १३ हजार गटप्रवर्तकांनी संपूर्ण कामकाजावर बहिष्कार घातला आहे. आशा कर्मचाºयांना शासनाने मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करण्यात यावी, त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तकांना शासन सेवेत कायम करावे, तोपर्यंत अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे या मागण्यांसाठी हे आशा कर्मचाºयांचे आंदोलन सुरू असून, शनिवारी शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी गोल्फ क्लब मैदानाबाहेर दिवसभर ठिय्या देऊन थाळीनाद आंदोलन केल्यानंतर सोमवारी सुमारे १३४२ आशा कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोनलन केले. आंदोलन काळातच शहरात जोरदार पाऊस सुरू असताना आंदोलकांना पोलिसांनी सुमारे दीड ते दोन तास वाहने उपलब्ध नसल्याने ताब्यात घेतले नाही. त्यामुळे आंदोलनासाठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या आशा कर्मचाऱ्यांना पावसातच आंदोलन करावे लागले. त्यानंतर ४ वाहनांतून ३२ फेऱ्या करून मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक परिसरातील मैदानावर थांबविण्यात आले. येथेही आशा कर्मचारी महिलांनी सोबत आणलेल्या छत्र्यांच्या आधारेच पावसात उभे राहून आंदोलन केले. सुमारे दोन तासांनंतर आंदोलन करणाºया महिलांची नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, यवतमाळ येथे आंदोलनादरम्यान आशा कर्मचाºयांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आशा कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात या घटनेच्या निषेधार्थ निवेदनही दिले. या आंदोलनात आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले, सुवर्णा मेतकर, माया घोलप, विजय दराडे, अर्चना गडाख, बेबी धात्रक, दीपाली कदम, वैशाली कवडे आदींसह शेकडो आशा कर्मचारी सहभागी झाले होते.    

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकPoliceपोलिस