मनमाड : लक्ष्मीनगर बंधाऱ्याचा पाणी फुगवटा क्षेत्रात एक अनोळखी युवक मृतावस्थेत आढळून आला. उंची १६७ सेमी, रंग निमगोरा, अंगात निळा शर्ट व जीन्स पँट असे मयत युवकाचे वर्णन असून, मयताच्या नातेवाइकांचा शोध घेणे कामी पोलीस प्रयत्न करत आहे.याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस कर्मचारी दगू बारहाते हे करत आहे. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडून मरण पावला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)’ नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत असलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}