चांदवडला हिंदू जन आक्रोश मोर्चा; शेकडोंच्या संख्येने लोक एकत्र

By महेश गलांडे | Updated: September 3, 2023 12:08 IST2023-09-03T12:08:33+5:302023-09-03T12:08:50+5:30

पोलिसांच्या प्रचंड गर्दीमुळे शहराला छावणीचे स्वरुप

Hindu Jan Akrosh Morcha in Nashik Chandwad city as Hundreds of people gathered | चांदवडला हिंदू जन आक्रोश मोर्चा; शेकडोंच्या संख्येने लोक एकत्र

चांदवडला हिंदू जन आक्रोश मोर्चा; शेकडोंच्या संख्येने लोक एकत्र

महेश गुजराथी, चांदवड : लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद विरोधात आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सकाळी ११ वाजता हिंदु जन आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चासाठी शेकडो लोक जमा झाले होते. येथील कृषी उत्पन्न बाजार आवारात हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी सकाळी १० वाजेपासूनच गर्दी झाली. भव्य व्यासपीठ तयार केले. व्यासपीठाचे समोर स्वयंसेवकांनी आकर्षक रांगोळी काढली व सभास्थानी जनरेटरची,  तसेच पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली. चांदवड शहर संपूर्ण कडेकोट बंद असून चांदवड शहराला पोलिसांच्या प्रचंड गर्दीमुळे छावणीचे स्वरुप आले.

चांदवड शहरातील मोर्चाच्या प्रमुख मार्गावरील सर्व वाहने हटविली गेली. कृषी उपन्न  बाजार समिती आवारात भगव्या टोप्या व उपरणे परिधान केलेले मोर्चेकरी दिसून आले. गावातील प्रमुख मार्ग वगळता इतर मार्गावर बॅरीकेटींग करण्यात आले. ग्रामीण भागातील व चांदवड तालुक्यातील महिला, पुरुष घोषणा देत मोर्चास्थळी विविध वेशभूषा करुन उपस्थित होते.

Web Title: Hindu Jan Akrosh Morcha in Nashik Chandwad city as Hundreds of people gathered