शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सायकलप्रेमींची ‘हेरिटेज राईड’

By admin | Updated: January 25, 2016 00:13 IST

उपक्रम : प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंना दिली भेट

नाशिक : शहराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून, पंचवटी ते तपोवन परिसरात याची साक्ष देणारी अतिप्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून, संस्कृतीची जोपासना होत आहे. हा अमूल्य वारसा जोपासण्याचा संदेश शहरातील शेकडो सायकलप्रेमींनी ‘हेरिटेज सायकल राईड’द्वारे दिला.शहरातील ही प्राचीन मंदिरे, वाडासंस्कृती याबद्दल जनजागृती करण्यासाठी, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे व वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा आणि इंधनाचा वापर कमी होऊन सायकलचा वापर वाढीस लागावा, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२४) सकाळी साडेसहा वाजता या आगळ्यावेगळ्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बहुसंख्य आबालवृद्ध सायकलप्रेमी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत सायकल घेऊन सहभागी झाले होते. सायकलला पॅडल मारत उत्साहाने सायकलस्वारांनी शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करत थंडीवर मात केली. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंघ बिरदी, डॉ. मनीषा रौंदळ, श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, किरण चव्हाण, दत्तू आंधळे, शैलेश राजहंस, रोहित वैशंपायन, कृष्णा प्रसाद आदि या सायकल फेरीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)