शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 20:35 IST

नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देट्रॅक्टर ट्रॉलीचा बसला जोरदार फटकागौणखनिजाची अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा

नाशिक : नानेगाव साखर कारखाना रस्त्यावर ट्रॅक्टर-दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचे शीर थेट धडावेगळे झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात नवनाथ बन्सी पवार (३०, रा. वऱ्हे दारणा, ता.निफाड) हे मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेने संपुर्ण शहरासह निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गौणखनिजाची अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली असल्याची परिसरात चर्चा आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नानेगाव साखर कारखान्याच्या रस्त्यावरुन पवार हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५ बीटी९५०३) भरधाव जात होते. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावरकरनगर या लोकवस्तीजवळ नानेगावकडून दगड-माती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एम.एच१५ डीयू ४५९४) ट्रॉलीला त्यांची दुचाकी येऊन धडकली. या अपघातात पवार यांच्या डोक्याला ट्रॉलीचा जोरदार फटका बसला आणि त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक विकास दगु सानप याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आलानानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दिवसरात्र होणारी गौणखनिजाची बेकायदेशीर वाहतूकीची माहिती महसूल प्रशासनाला असूनही या मार्गावर आजपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल होत नाही पण शनिवारी झालेल्या अपघाताने नानेगावहून आपल्यागावी परतणाऱ्या तीस वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागला. ट्रॅक्टरमध्ये मुरूमाची जीवघेणी वाहतूक प्रशासनाच्या मेहेरनजरमुळे सुरु असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ट्रक्टर व दुचाकीमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार पवार यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. यावेळी मदतीसाठी धावुन आलेले प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे उभे राहिले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकroad safetyरस्ते सुरक्षा