शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या बांधकामावर हातोडा

By admin | Updated: July 3, 2016 00:46 IST

मनपाकडून कारवाई : गोठ्याच्या बांधकामावर कारवाई

 नाशिक : राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक विनायक तथा नय्या खैरे यांनी म्हसरूळ परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या जनावरांच्या गोठ्यातील गव्हाणीचे पक्के बांधकाम ‘जैसे थे’ ठेवल्याने अखेर महापालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत बांधकाम उद््ध्वस्त करण्याची कारवाई केली.म्हसरूळ परिसरात किशोर सूर्यवंशी मार्गाजवळ असलेल्या १८ मीटर डीपी रस्त्यात गोठ्याचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. नगरसेवक विनायक खैरे यांनी उभारलेल्या या गोठ्याबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. थेट रस्त्यातच हा गोठा थाटण्यात आला होता. या गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र थेट रस्त्यावर येऊन त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, परंतु उघडपणे कुणी विरोध करत नव्हते. सदरचा गोठा हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले; परंतु राजकीय दबावामुळे गोठा हटविण्यास अडचणी उद्भवत होत्या. महापालिका आयुक्तांनी याबाबत कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी ३० मे रोजी पोलिसांचा फौजफाटा नेत गोठ्याचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही सुरू केली होती. परंतु, खैरे यांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केल्याने पथक माघारी परतले होते. नंतर खैरे यांनी सदर बांधकाम काढून घेण्यासाठी महिनाभराची मुदतही मागितली होती. त्यानुसार मुदत देण्यात आली, परंतु खैरे यांनी मुदतीतही बांधकाम हटविले नाही. केवळ पत्र्याचे शेड काढून घेताना आरसीसी बांधकाम केलेल्या सीमेंटच्या पक्क्या गव्हाणी तशाच ठेवल्या. त्यामुळे पुन्हा एकदा कब्जा होण्याची शक्यता होती. शनिवारी महापालिकेने एक पोकलॅन आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने सदर गव्हाणीचे पक्के बांधकाम उद््ध्वस्त केले. सीमेंटमधील सर्व गव्हाणी यावेळी हटविण्यात आल्या. (प्रतिनिधी)