शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे रेशन दुकानदार संपातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:43 IST

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

नाशिक : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णात रेशन दुकानदार संघटनेचे नेतृत्व करणाºया जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्या नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांनी शनिवारी धान्य उचलण्यासाठी पुरवठा खात्यात चलने भरल्यामुळे या संपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. राज्यातील रेशन दुकानदारांनी १ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला असला तरी, नाशिक शहरातील सुमारे दोनशेहून अधिक दुकानदारांनी सरकारसोबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त करून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्णातील रेशन दुकानदारांनी संप यशस्वी करण्याचा चंग बांधला होता व त्यादृष्टीने गावोगावी बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार संप सुरू होऊन आता पाच दिवस लोटले असून, सरकारकडून अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. रविवार व सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाला सुटी असल्यामुळे मंगळवारनंतरच संपावर तोडगा निघू शकतो हे स्पष्ट झाल्यामुळे रेशन दुकानदारांचा धीर सुटत चालला आहे. महिन्याचा पहिलाच आठवडा असल्याने रेशनवरील धान्य विक्रीसाठी हा आठवडा महत्त्वाचा असतो त्यामुळे बºयाचशा रेशन दुकानदारांनी संपाकडे पाठ फिरवून दुकाने सुरू केली आहेत. नाशिक जिल्ह्णात २६०९ रेशन दुकानदार असून, त्यापैकी १५०६ दुकानदार संपात सहभागी झाले असून, नाशिक, सिन्नर, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यातील दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी काही दुकानदार संपातून बाहेर पडण्याची शक्यता गृहीत धरून पुरवठा खात्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सबुरीची भूमिका घेतली आहे, तर काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी संपातून माघार घेतली आहे. मात्र प्रशासन रेशन दुकानदारांवर दडपण आणत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहेत.