शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गर्भपातासाठी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:27 AM

सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमाता-बालमृत्यूतही वाढ : शोधासाठी मोहीम

नाशिक : सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारी ९०८ इतकाच आहे. त्यामानाने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये हाच जन्मदर अधिक असल्याचे लक्षात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुलींचे घटते प्रमाण पाहता, गर्भपाताला प्रोत्साहन मिळत असण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केला आहे. राज्यात गर्भपातविरोधी कायदा असून, जिल्ह्णातही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्यामुळे गर्भपाताच्या सोयी नसल्यामुळे कदाचित सुरगाण्याला लागूनच गुजरात राज्य आहे. या राज्यात गर्भपात करून देणारी यंत्रणा कार्यान्वित असावी असा आरोग्य खात्याला संशय आहे. त्यामुळे सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन आहे काय याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.भुवनेश्वरी यांनी आरोग्य विभागाला ‘फोकस सुरगाणा’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तंबाखू व दारूमुळे आदिवासी स्त्री व पुरुषांचे वजन कमी होते. त्यातूनच आरोग्यविषयक समस्या उद्भवून मृत्यूच्या घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.तालुक्यात बाळंतपणात महिला मृत्यूचे तर बालमृत्यूचे प्रमाणही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असून, चालू वर्षी १६९ मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सजग झाला आहे. माता व बालमृत्यूचे वाढते प्रमाण पाहता त्यामागच्या कारणांचाही शोध घेतला असता, प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व दारूचे व्यसन या दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यGujaratगुजरात