शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ आरोग्याबाबत सटाण्यात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:28 IST

सटाणा येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देबहि:शाल मंडळ : पुणे विद्यापीठ यांचा उपक्रम

सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन मविप्रचे उपसभापती राघो आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. शिबिराच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रकाश जगताप यांनी ज्येष्ठांचे आरोग्य या विषयावर अंतर्गत विविध आजार व त्यांच्या लक्षणांची माहिती दिली. ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार-विहार किती आवश्यक आहे, याचे महत्त्व पटवून दिले. पहिल्या सत्रातील दुसरे वक्ते डॉ. विद्या सोनवणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास या विषयावर माहिती दिली. त्यांनी योग्य प्रात्यक्षिकांसह योगाचे महत्त्व पटवून दिले. ज्येष्ठांसाठी कोणती योगासने वयोमान व आजारानुसार करावीत किंवा करू नयेत याची सखोल माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक शिबिराच्या द्वितीय सत्रात संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य या विषयावर दिलीप धोंडगे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवनपट साकारला. बाबांचे अंधश्रद्धाविरोधी कार्य, स्वच्छता, आरोग्य, समाजसेवा, श्रमनिष्ठा, भक्तिभाव आदी सर्व विषयांचा ऊहापोह केला.द्वितीय सत्रात दुसरे वक्ते अ‍ॅड. पंडित भदाणे यांनी ज्येष्ठांसाठी असलेले कायदे, योजना व मार्गदर्शन याविषयी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये ज्येष्ठांसाठी असणारे कायदे आणि सध्या त्यामध्ये घडवून आणावयाचे बदल, वकिलांचे योगदान त्यांनी स्पष्ट केले. मृत्युपत्राविषयी सखोल माहिती त्यांनी दिली. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद पाटील हे होते. याप्रसंगी ज्येष्ठांचे प्रातिनिधिक मनोगत सुरेश नारायण बागड, दगाजी संपत वाघ, जिभाऊ खंडू सोनवणे, पंडित त्र्यंबक सोनवणे यांनी मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दीपा कुचेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. नीलेश पाटील यांनी केला, तर आभार धनंजय पंडित यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोगcollegeमहाविद्यालय