गर्दुल्ल्याने केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:44 IST2017-08-29T01:43:55+5:302017-08-29T01:44:00+5:30

भद्रकालीतील तलावडी परिसरात दोन गर्दुल्ल्यांमधील बाचाबाचीत आईवरून शिवी दिल्याचा राग येऊन एकाने दुसºयावर चाकूने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़ संपत काशीनाथ कडाळे (३०, रा़चाचडगाव, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) असे खून करण्यात आलेल्या गर्दुल्ल्याचे नाव आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित विन्या उर्फ गणेश राजाराम जाधव (२६, राख़ंबाळे, ता़त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे़

 Gradulane's friend Mitra's murder | गर्दुल्ल्याने केला मित्राचा खून

गर्दुल्ल्याने केला मित्राचा खून

नाशिक : भद्रकालीतील तलावडी परिसरात दोन गर्दुल्ल्यांमधील बाचाबाचीत आईवरून शिवी दिल्याचा राग येऊन एकाने दुसºयावर चाकूने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़ संपत काशीनाथ कडाळे (३०, रा़चाचडगाव, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) असे खून करण्यात आलेल्या गर्दुल्ल्याचे नाव आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित विन्या उर्फ गणेश राजाराम जाधव (२६, राख़ंबाळे, ता़त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडाळे व जाधव हे दोघेही गर्दुल्ले असून, त्यांचे वास्तव्य हे तलावडी परिसरात होते़ रात्रीच्या वेळी हे दोघे परिसरातील एखाद्या बंद दुकानाच्या शटरलगत झोपत असत़ सोमवारी सकाळी सव्वा वाजेच्या सुमारास तलावाडी परिसरातील मलजल उपसा केंद्राजवळ या दोघांमध्ये बाचाबाची व शिवीगाळ सुरू होती़ त्यातच संपत कडाळे याने संपत जाधव यास आईवरून शिवीगाळ सुरू केली़ यामुळे संतप्त झालेल्या जाधवने खिशातील चाकू काढून कडाळेच्या छातीवर वार केले़ या घटनेनंतर तलावडी येथील अजिज शेख, प्रमोद धोंगडे, मीराबाई साठे व आणखी काही नागरिक जमा झाले व त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली़ यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कडाळे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या खुनानंतर फरार झालेला संशयित गणेश जाधव यास भद्रकाली पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.

Web Title:  Gradulane's friend Mitra's murder