गोल्फ क्लबचे रखडललेले काम एप्रिल पर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:14 IST2019-11-15T15:11:51+5:302019-11-15T15:14:20+5:30

नाशिक- गोल्फ क्लबच्या नुतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिल पर्यंत पुर्ण होणार असून तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे.

 The golf club's work will be completed by April | गोल्फ क्लबचे रखडललेले काम एप्रिल पर्यंत पूर्ण होणार

गोल्फ क्लबचे रखडललेले काम एप्रिल पर्यंत पूर्ण होणार

ठळक मुद्देशहर अभियंत्याचे अश्वासनहेमलता पाटील यांनी केले होते आंदोलन

नाशिक- गोल्फ क्लबच्या नुतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिल पर्यंत पुर्ण होणार असून तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे.

गोल्फ क्लब येथील जॉँगींग ट्रॅक परीसरात नुतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. मात्र सध्या हे थांबले असून ते कधी सुरू होणार याबाबत कोणालाही माहिती नाही. शासनाकडून शहरात मॅकेनिकल पार्कींगासाठी आलेला निधी या कामासाठी वळविण्यात आला असून महापालिकेचाही निधी त्यात असल्याने सुमारे बारा कोटी रूपये खर्च करून हे काम केले जात आहे. तथापि, काम सुरू झाल्यानंतर ते अत्यंत संधगतीने सुरू आहे. दररोज या ट्रॅकवर सुमारे पंधरा हजार नागरीक सकाळ सायंकाळ जॉगींगसाठी येत असतात. त्यांची गैरसोय होत असून त्यांना अन्य जॉगींग ट्रॅकवर जावे लागत आहे. प्रभागाच्या नगरसेविका म्हणून देखील पुरेशी माहिती मिळत नसल्याने डॉ. हेमलता पाटील यांनी बुधवारी (दि.१३) गोल्फ क्लब येथेच धरणे आंदोलन केले होते.

महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आंदोलनाच्या दरम्यान डॉ. हेमलता पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि शहर अभियंता घुगे यांना पाठवून सविस्तर माहिती सादर देतो असे सांगितले. मात्र घुगे सायंकाळी गेलेच नाही. त्यामुळे डॉ. पाटील यांनी आता यासंदर्भात महासभेतच जाब विचारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरूवारी (दि.१४) घाईघाईने घुगे यांनी डॉ. पाटील यांना माहिती दिली असून दोन ते दिवसात काम पुन्हा सुरू होईल त्याच प्रमाणे एप्रिल पर्यंत काम पुर्ण होईल अशी माहिती लिखीत स्वरूपात दिली आहे.

Web Title:  The golf club's work will be completed by April