शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांना गटारी अमावास्या पडली महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:37 IST

पोलिसांचा कडक बंदोबस्त : ३५ तळीरामांवर कारवाई : ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आषाढ अमावास्या अर्थात गटारी अमावास्येला मद्यप्राशन करून वाहन चालविणे मद्यपींना चांगलेच महागात पडले़ पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेने ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३५ तळीरामांवर केलेल्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हअंतर्गत कारवाई करण्यात आली़आषाढ अमावास्या ही रविवारी आल्याने तसेच सोमवारपासून श्रावणमासास प्रारंभ होत असल्याने मांसाहार व मद्यपान करणाऱ्यांनी अनेक हॉटेल्स तसेच मद्यविक्री दुकानांबाहेर गर्दी केली होती़ त्यामुळे रविवारी दिवसभर शहर तसेच पर्यटनस्थळांवरील हॉटेल तसेच बिअरबारमध्ये तळीरामांची मोठी गर्दी होती़ कायदा व सुव्यवस्था तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांनी कॉलेजरोड, दिंडोरीरोड, मुंबई-आग्रा रोड, औरंगाबादरोड, गंगापूररोड, पुणेरोड अशा सर्वच ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते़ पोलीस दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांची ठिकठिकाणी ब्रेथ अ‍ॅनालायझरने तपासणी करीत होते़ दरम्यान, पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कारवाई करण्यात आलेल्या तळीरामांच्या संख्येत भरच पडण्याची शक्यता आहे़