अडीच लाखांची सात तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:24+5:302021-01-13T04:35:24+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये नातेवाइकाच्या लग्नसोहळ्याला आलेल्या वैभवी विश्वनाथ शेळके (३७ रा.गंगापूर रोड) ...

A gold chain weighing seven and a half lakhs was snatched | अडीच लाखांची सात तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली

अडीच लाखांची सात तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली

याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये नातेवाइकाच्या लग्नसोहळ्याला आलेल्या वैभवी विश्वनाथ शेळके (३७ रा.गंगापूर रोड) या त्यांचे पती व मुलांसमवेत लॉन्समध्ये जात असताना, संध्याकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेत धूम ठोकली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात शेळके यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. शेळके पायी जात असताना, संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावरून त्याने भरधाव दुचाकी त्यांच्याजवळ आणली आणि पोत हिसकावून सुसाट धूम ठोकली. पाच तोळ्यांचे मंगळसूत्र त्यामध्ये एक तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे त्यामध्ये असलेले मणी असे सुमारे सात तोळ्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच, आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरून त्वरित परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देत, गस्तीवरील पोलिसांना सतर्क करण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सोनसाखळी चोर हाती लागला नाही.

----इन्फो----

काळ्या रंगाच्या पल्सरवरून महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणं पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्याने मागील अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. काळे कपडे परिधान करून भरधाव दुचाकी चालवत, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारा हा चोरटा पोलिसांच्या हाती कधी येणार? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: A gold chain weighing seven and a half lakhs was snatched