शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलनाचा पहिला मान लाभण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:32 IST

नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.

ठळक मुद्देसंमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपासनी यांनी केले.

नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.

ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले.९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत बाल मेळाव्याबाबतीत नाशिकचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते.

शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध असून, शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपासनी यांनी केले.यावेळी व्यासपीठावर वैशाली झनकर-वीर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, नीलेश पाटोळे, उपशिक्षणाधिकारी ए. एम. बागुल, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था व शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक भेटी व सहली यांचे आयोजन करतात, त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम आवश्यक असल्याचे वैशाली झनकर-वीर यांनी सांगितले. बालकुमार मेळावा प्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रास्ताविकातून बाल मेळाव्याची माहिती दिली.

संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांनी आभार मानले. या बैठकीत रंजन ठाकरे, स्वप्नील पाटील, गीता बागुल, सविता कुशारे, अभिजीत साबळे आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक