ट्रकच्या धडकेत बालिका ठार

By Admin | Updated: March 2, 2016 23:34 IST2016-03-02T23:32:58+5:302016-03-02T23:34:03+5:30

ट्रकच्या धडकेत बालिका ठार

The girl was killed by a truck | ट्रकच्या धडकेत बालिका ठार

ट्रकच्या धडकेत बालिका ठार


सुरगाणा : तालुक्यातील शिंदे (दिगर) फाट्यावर बुधवारी ३ वाजेच्या सुमारास सहा वर्षीय बालिकेला ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे नाव रेखा हरी वारडे (६) असे आहे.
तालुक्यातील वडमाळ (बिवळ) येथील रहीवासी असलेली रेखा घाटमाथ्यावरील शिंदे (दिगर) येथे गिरजिादेवी आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपुर्वी ती तिच्या घरी वडमाळ (बिवळ) येथे आलेली होती. बुधवारी पुन्हा शाळेत जायचे असल्याने आई अनुसयाबाई यांनी मोठी मुलगी पुजा व रेखा या दोघींना सोबत घेऊन सुरगाण्यापर्यंत आणले. येथून वणीकडे जाणाऱ्या प्रवासी जीपमध्ये बसवून दिले. शिंदे फाट्यावर जीप मधून उतरल्यानंतर मोठी बहीण प्रवासभाडे देईपर्यंत रेखा दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली होती. आणि याच दरम्यान सुरगाण्याकडे रेशनचा शासकिय तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र . एम.एच. १५ बी.जे. ३००२) उभ्या असलेल्या रेखाला चिरडले. रेखाला सुरगाणा ग्रामिण रूग्णालयात दाखल केले असता डॉ.बांगर यानी तिला मृत घोषित केले.
अपघातात ठार झालेल्या रेखाच्या पश्चात आई, वडील, पाच बहीणी व एक लहान भाऊ असा परिवार आहे. रेखा ही बहीणींमध्ये लहान होती. ट्रकचालक शंकर वाघ रा.जेलरोड, नाशिकरोड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस निरिक्षक लिलाधर कानडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The girl was killed by a truck