मालेगावी फुगे विक्रेत्यांकडील सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:32 IST2019-12-16T12:32:01+5:302019-12-16T12:32:32+5:30

मालेगाव : फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक मुलगी ठार त सहा मुले गंभीर जखमी झाले आहेत.

 Girl killed in cylinder blast in Malegaon bubbles | मालेगावी फुगे विक्रेत्यांकडील सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार

मालेगावी फुगे विक्रेत्यांकडील सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार

मालेगाव : फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक मुलगी ठार त सहा मुले गंभीर जखमी झाले आहेत.
तालुक्यातील घोडगाव परिसरातील खडकवाडी वस्तीत सोमवारी गुलाबनबी बाबा यात्रोत्सव सुरू झाला. त्यात अनेक खेळण्यांची दुकाने लागलेली आहेत. त्याप्रमाणेच फुगे विक्रेत्यांचेही दुकान थाटले आहे. सकाळच्या सुमारास एका फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटात सोनाली सुभाष गांगुर्डे (१५) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या आजूबाजूच्या सहा मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याशिवाय फुगे विक्रेताही गंभीर जखमी झाला आहे. स्फोट होताच परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

Web Title:  Girl killed in cylinder blast in Malegaon bubbles

टॅग्स :Nashikनाशिक