गौराई माझी लाडाची ...!!

By Admin | Updated: September 10, 2016 01:23 IST2016-09-10T01:23:04+5:302016-09-10T01:23:15+5:30

गौरींचे पूजन, आज होणार विसर्जन

Gaurai is my laddie ... !! | गौराई माझी लाडाची ...!!

गौराई माझी लाडाची ...!!

नाशिक : ‘गौराई माझी लाडाची लाडाची गं’ असे म्हणत गुरुवारी माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींना पुरणाचा नैवेद्य दाखवून गोडाधोडाचे जेवण देत आणि विविध दागिन्यांनी मढवत पाहुणचार देण्यात आला.
गुरुवारी (दि. ८) महालक्ष्मीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शुक्रवारी (दि. ९) ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने कुळधर्म, कुळाचार करण्यात आला. शहरात घरोघरी वेगवेगळ्या गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. उभ्या आणि बैठ्या स्वरूपात गौरींची विविध रूपे यावेळी बघायला मिळतात. पितळी, तांबे, चांदी, पंचधातूमध्ये पॉलिश केलेले आकर्षक मुखवटे यावेळी खुलून दिसत होते. गौरींच्या भोजन सोहळ्याबरोबरच शुक्रवारी संध्याकाळी महिलांचा हळदी-कुंकवाचा समारंभदेखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात येणार असून, विसर्जनासाठी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनंतर अनुकूल मुहूर्त आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना सण-उत्सव साजरे करायला वेळ देता येत नसल्याने बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी फक्त मुखवटे हलवून आरास भाविकांच्या दर्शनासाठी तशीच ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gaurai is my laddie ... !!