आरटीओ कॉर्नर येथे मिठाई दुकानात गॅसगळती

By Admin | Updated: August 3, 2014 01:59 IST2014-08-03T01:14:28+5:302014-08-03T01:59:47+5:30

आरटीओ कॉर्नर येथे मिठाई दुकानात गॅसगळती

Gasoline in a sweet shop at RTO Corner | आरटीओ कॉर्नर येथे मिठाई दुकानात गॅसगळती

आरटीओ कॉर्नर येथे मिठाई दुकानात गॅसगळती

 

पंचवटी : दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नरलगत असलेल्या ‘राज स्वीट्स’ या मिठाईच्या दुकानात गॅसगळती होऊन भट्टीने पेट घेतल्याने दुकानातील एका कामगारचा हात भाजला. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही़
दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नरवर राज स्वीट्स दुकान असून, दुकानाबाहेरच भट्टी लावून खाद्यपदार्थ तयार केले जातात़ सकाळी दुकानातील कामगार काम करीत असताना गॅसगळती झाली व त्यानंतर भट्टीतून मोठा जाळ निघाला अन् एका कामगाराचा हात भाजला़ मिठाईच्या दुकानात गॅसगळती झाल्याचे समजताच दुकानातील कामगार तसेच शेजारचे दुकानदार व नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले़ दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी पंचवटी अग्निशामक दलाला कळविली. त्यानंतर अग्निशामकचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते़
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या कामगाराला उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात दाखल केले याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Gasoline in a sweet shop at RTO Corner