शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने ओस, साहित्य खरेदीचा भारी सोस

By admin | Updated: September 23, 2015 23:43 IST

देखभालीअभावी दुरवस्था : बेंचेस खरेदीसाठी निविदाप्रक्रिया

नाशिक : शहरातील बहुसंख्य उद्यानांची देखभालीअभावी विदारक स्थिती असताना त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी महापालिकेला मात्र खेळणी आणि बेंचेस खरेदीचा सोस असल्याचे दिसून येत आहे. आधी उद्याने जगवा मग उद्यानांमध्ये साहित्य बसवा, असा पवित्रा सदस्यांसह नागरिकांकडून घेतला जाऊ लागला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील विविध उद्याने तसेच खुल्या जागा व मोकळ्या परिसरात बेंचेस बसविण्यासाठी सुमारे ४१ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढल्याने विभागाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. शहरात महापालिकेची सुमारे ४७० हून अधिक उद्याने आहेत. सुमारे १५० उद्यानांची देखभाल ही महापालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. गेडाम यांनी २८६ उद्यानांची देखभाल खासगीकरणाच्या माध्ममातून करण्याचा प्रस्ताव महासभेवर मांडला होता. त्यासाठी ३ वर्षांचा ठेका देण्याचे प्रस्तावित करताना संबंधित मक्तेदारासाठी ६३ कलमी कठोर नियमावलीही आयुक्तांनी तयार केली होती. सदर उद्यानांची एकत्रित निविदा काढून कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्याचा आयुक्तांचा प्रयत्न होता. परंतु महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावत महिला बचत गटांना उद्यान देखभालीचे काम देण्याचा ठराव केला होता शिवाय संबंधित महिलांना मुक्त विद्यापीठामार्फत उद्यान विद्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्याचाही निर्णय झाला होता. सदरचा ठराव होऊन सहा महिने लोटले तरी प्रशासनाकडून अद्याप महिला बचत गटांकडे उद्याने सोपविण्याची कार्यवाही झालेली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण सांगत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत टोलवाटोलवीच केल्याचा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय उद्यानांबाबत महासभा, स्थायी समिती तसेच प्रभाग समित्यांच्या सभांमध्येही सदस्यांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. अनेक उद्यानांची स्थिती देखभालीअभावी अतिशय गंभीर बनली असून बऱ्याचशा उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने नागरिकांना त्याठिकाणी लहान मुलांना पाठविणे धोक्याचे बनले आहे. काही उद्यानांचा ताबा तर जुगारी, मद्यपींना घेतलेला दिसून येतो. उद्याने अशी ओस पडलेली असताना त्याठिकाणी देखभाल-दुरुस्तीची कामे करण्याऐवजी महापालिकेचा उद्यान विभाग बेंचेस व खेळणी बसविण्याचा घाट घालत आहे. ज्या उद्यानांमध्ये नागरिकांना बसणे तर दूरच प्रवेश करणेही अवघड होऊन बसले आहे. तेथे बेंचेस टाकण्याचा हा उपद्व्याप कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जी उद्याने बऱ्यापैकी विकसित झालेली आहेत आणि देखभालीच्या दृष्टीने सुस्थितीत आहेत तेथे खेळणी व बेंचेस बसविण्यास हरकत नाही परंतु जी उद्याने ओस पडली आहेत तेथेही साहित्य बसविण्यासाठी खरेदीचा सोस सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)