फरार दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:00 AM2021-09-17T01:00:01+5:302021-09-17T01:01:55+5:30

वर्षभरापासून फरार असलेल्या दुचाकी चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मोरवाडीतून ताब्यात घेतले आहे.

Fugitive bike thief arrested | फरार दुचाकी चोरट्यास अटक

फरार दुचाकी चोरट्यास अटक

Next

नाशिक : वर्षभरापासून फरार असलेल्या दुचाकी चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मोरवाडीतून ताब्यात घेतले आहे. संशयित चेतन ऊर्फ भावड्या अशोक झनकर (२५,रा. मोरवाडी, अंबड) हा दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांना वर्षभरापासून हवा होता. त्याने म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत साथीदार संशयित पवन पवारच्या मदतीने आरटीओ कार्यालयाच्या परिसरातून दुचाकी चोरी केली होती, अशी कबुली पोलिसांना दिली. पथकाने त्यास ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी म्हसरुळ पोलिसांच्या हवाली केले.

Web Title: Fugitive bike thief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.