पोलीस प्रबोधिनीसमोर युवकावर धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 23:26 IST2016-03-05T23:26:06+5:302016-03-05T23:26:47+5:30

पोलीस प्रबोधिनीसमोर युवकावर धारदार शस्त्राने वार

In front of the Police Academy, | पोलीस प्रबोधिनीसमोर युवकावर धारदार शस्त्राने वार

पोलीस प्रबोधिनीसमोर युवकावर धारदार शस्त्राने वार

 नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीसमोर एका युवकावर चौघा संशयितांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेत गंभीर झालेल्या युवकाचे नाव समीर इस्माईल शेख (२१) असे असून तो उत्कर्षनगरमधील रहिवासी आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रबोधिनीसमोर समीर शेख याचे दुकान असून, शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे आपल्या दुकानासमोर गप्पा मारत होता.़ त्यावेळी तेथील तीन युवकांशी त्याचा किरकोळ वाद झाला़ या वादातून भरत परदेशी, शिवा परदेशी व त्यांच्या दोन साथीदारांनी शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये पाठीवर, पोटात तसेच गुप्त भागाजवळ वार करण्यात आल्याने शेख जमिनीवर कोसळला. यानंतर जखमी शेखला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: In front of the Police Academy,