शिक्षक संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: September 3, 2016 23:12 IST2016-09-03T23:12:07+5:302016-09-03T23:12:27+5:30

देशव्यापी संप : संस्थाचालकांसह पालकही सहभागी झाल्याचा दावा

A front organization of the tahsil office of the teacher organization | शिक्षक संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

शिक्षक संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

 सिन्नर : तालुक्यातील शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांसह संस्थाचालक व पालकही सहभागी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला आहे. हुतात्मा स्मारकापासून कामगार संघटना व शिक्षक संघटना यांनी एकत्र
येऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विद्यासचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनेने तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. २८ आॅगस्टचा जाचक शासन निर्णय रद्द करावा, अतिरिक्त ठरलेले शिक्षक कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन होईपर्यंत मूळ आस्थापनेवरून वेतन सुरू ठेवण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना त्वरित बंद करून जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, शिक्षक-शिक्षकेतर संघटना यांच्या आदेशान्वये कायम शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विद्यासचिव एस. बी. देशमुख, टी.डी.एफ.चे तालुकाध्यक्ष पी. डी. विंचू, विद्या साळुंखे, बी. व्ही. पांडे, दत्तात्रय आदिक, यू. बी. आव्हाड, कैलास काळे, आर. व्ही. भगत, एम. एन. देशमुख, एम. डी. काळे, राजेंद्र मिठे यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: A front organization of the tahsil office of the teacher organization