शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; अवघ्या ५ मिनिटांत झाली सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:03 IST

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात बुधवारी ताजी अपडेट आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून दिलेला नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत होता. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाची व्याप्ती आणि चर्चा पाहता, प्रचंड पोलिस बंदोबस्तात खरातला कोर्टात आणण्यात आले आणि अवघ्या पाच मिनिटांत सुनावणी होऊन त्याला कोर्टाबाहेर नेण्यात आले.

न्यायालयात काय-काय घडलं?

न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कोर्टरूममध्ये दाखल झाले. सरकारी वकील शैलेंद्र बागडेही हजर झाले. आधी सरकारी वकीलांच्या युक्तीवादाला सुरूवात झाली. न्यायाधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही शिक्षा पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली. आता उद्या पुन्हा त्याला दुसऱ्या गुन्ह्या संदर्भातील सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. आज कोणताही युक्तिवाद झाला नाही.

खरातची पत्नी फरार

अशोक खरातची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान तो चार वेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे समोर आले. या मोबाईलमधील माहितीवरून अनेक धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या या कृत्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या ती फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिलाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातच्या अटकेमुळे नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या दोन बड्या नेत्यांची नावे चर्चेत आल्याने अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.

खरातने घातला लाखोंचा गंडा

भोंदूगिरी करून, अघोरी विद्या किंवा दैवी शक्तीचा दावा करून खरातने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा मुक्काम आता कारागृहात असणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असून, खरातने आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याचे पुरावे गोळा केले जात आहेत. अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Baba Ashok Kharat gets 14 days judicial custody.

Web Summary : Ashok Kharat, accused in a fraud case, was presented in Nashik court after police custody. Considering the case's seriousness, the court remanded Kharat to 14 days of judicial custody. He will now be sent to judicial custody.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCourtन्यायालय