शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी

By admin | Updated: December 1, 2014 01:24 IST

किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी

सुरगाणा - येथे किरकोळ वादाचे पर्यावरण हाणामारीत होऊन कात्रीने भोसकल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांच्या घरासमोरच हा प्रकार घडला. यामुळे तणाव निर्माण झाल्याने शहरात शिघ्र कृती दलाचा बंदोबस्त लावण्यात आला.या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेत मयत झालेला अक्षय सोनवणए (२०) त्याचा लहान भाऊ रोहीत व चुलत भाऊ शुभम दोघे रस्त्याने जात असताना यशवंत चौधरी यांनी त्यांना शिवणकामाच्या दुकानात बोलावून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर अक्षय व त्याचे मित्र राजेंद्र थोरात, गणेश वडनेरे, भूषण सूर्यवंशी हे दुकानजवळ याचा जाब विचारण्यासाठी जमा झाले असता यशवंत याने कपडे कापण्याच्या मोठ्या कात्रीने एका एकावर वार करण्यास सुरुवात केली. त्यात अक्षयच्या डाव्या मांडीवर जोरदार वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले. अक्षययाला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परतु तेथे पुरेशी सुविधा नसल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मृत घोषीत केले.दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळता पोलीस निरीक्षक सुरेश पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यशवंत चौधरी यास ताब्यात घेऊन अटक केली. अक्षयच्या मृत्यूची बातमी कळताच नागरिकांनी आपआपली दुकाने बंद ठेवली.दरम्यान सदर वाद सुरु होता त्याचवेळी पोलिस निरिक्षक पारधी यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर मोठा न होता पुढील अनर्थ टळला असता असा आरोप अनेकांनी करुन पारधी यांचे निलंबनाची कारवाई करावी आणि आरोपी चौधरी यांस कडक शासन केले जावे या मागणीसाठी नाशिकहून शववाहिकेने आणलेला मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आला. तसेच कारवाईबाबत वरिष्ठ अधिकारींकडून ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत अक्षयचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोरुन हलवणार नाही असा निर्णय नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. यावेळी चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी दिल्यानंतर मृतदेह अक्षयच्या निवासस्थानी ठेवण्यात आला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अक्षयवर अत्यसंस्कार करण्यात आले.अक्षयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.अक्षय हा येथील गॅस एजन्सीत दोन वर्षापासून कामाला होता. त्यामुळे शहरात सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्याच्या अकस्मात झालेला निधनामुळे शहरात शोककळा पसरली. (वार्ताहर)