शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना वाव

By admin | Updated: September 12, 2015 23:20 IST

अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना वाव

सातपूर : आॅटोमोबाइल, अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना नाशिकमध्ये चांगला वाव असून, जपानी उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे साकडे निमा आयमा पदाधिकाऱ्यांनी जपानी कौन्सुलेटला घातले.निमा आणि आयमा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन जपानी कौन्सुलेट जनरलची भेट घेतली. यावेळी कौन्सुलेट जनरल आॅफ जपानच्या इकॉनॉमी विभागाचे मिसुकी एगुची, जनरल योशियाकी युटो, चिफ कॉन्सुल योशिमित्सु कवाटा, रिसर्चर युटो सैटो या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, आयात-निर्यात उपसमितीचे अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, मनीष रावल, संदीप भदाणे, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे आदिंनी सविस्तर चर्चा केली व प्रेझेंटेशन सादर केले. आॅटोमोबाइल, अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना नाशिकमध्ये चांगली संधी असून, जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, रस्ते, रेल्वे यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.नाशिकच्या उद्योगक्षेत्राची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद देत जपानी शिष्टमंडळाने नोव्हेंबर महिन्यात नाशिकला भेट देण्याचे मान्य केले. भेटीअंती गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन जपानी शिष्टमंडळाने निमा आयमा पदाधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी दिले. (वार्ताहर)