महावितरणमध्ये ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:38+5:302021-02-05T05:43:38+5:30

नाशिक : महावितरणच्या विद्युत भवन कार्यालय आवारात विद्युत भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता ...

Flag hoisting at MSEDCL | महावितरणमध्ये ध्वजारोहण

महावितरणमध्ये ध्वजारोहण

नाशिक : महावितरणच्या विद्युत भवन कार्यालय आवारात विद्युत भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले उपस्थित होते. ध्वजारोहणापूर्वी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी कोरोनावर मात केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्प देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी अभियंते धनंजय दीक्षित, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, सुरेश सवाईराम, नीलेश चालिकवार, प्रेरणा बनकर, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ : महावितरण कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्यासह अधिकारी, अभियंते व जनमित्र यांनी केले. (२७ महावितरण)

Web Title: Flag hoisting at MSEDCL