येवल्यात एकारात्रीत पाच चोऱ्या : ऐवज लंपास

By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-01T23:43:46+5:302014-08-02T01:23:14+5:30

येवल्यात एकारात्रीत पाच चोऱ्या : ऐवज लंपास

The five thieves on one side in Yeola: Vivas Lampas | येवल्यात एकारात्रीत पाच चोऱ्या : ऐवज लंपास

येवल्यात एकारात्रीत पाच चोऱ्या : ऐवज लंपास

येवला : येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मिल्लतनगरव विठ्ठलनगर भागात पाच ठिकाणी चोऱ्या झाल्या. या चोऱ्यांत सव्वा लाखाचा ऐवजासह सोन्याची पोत व टीव्ही व मोटारसायकलदेखील चोरीला गेली आहे.
गुरुवारी रात्री मिल्लतनगर भागातील घरांचे कडीकोयंडे तोडून चोरी झाली. सय्यद सत्तार सय्यद अब्बास यांचे घरातून रोख रुपये ६० हजार, मजीदखान जब्बारखान पठाण यांचे घरातून रोख रुपये ५० हजार व सोन्याची पोत, नजीर शेख इब्राहीम यांचे घरातील किरकोळ सामानांची चोरी झाली हे सर्व रहिवाशी मिल्लतनगर भागातील आहे. बंद घर असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोऱ्या केल्या.
सविता सतीश निकम यांचे विठ्ठलनगर येथील घरातून एलसीडी टीव्ही व रोख १५ हजार रुपये चोरीला गेले. पप्पू अशोक सुपेकर यांचे राहते घरापासून चोरट्यांनी मोटारसायकल लांबविली.
चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी लक्षात आला. घरातील सामानाची नासधूस चोरट्यांनी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर)

Web Title: The five thieves on one side in Yeola: Vivas Lampas