शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

लासलगावनजीक भीषण अपघातात पाच ठार; हायवाची ॲपेरिक्षेला धडक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 9:02 PM

Accident : अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

लासलगाव (नाशिक) : ॲपेरिक्षा आणि हायवा यांच्यामध्ये लासलगाव-विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेससमोर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. मृतात नगर जिल्ह्यातील लोणी (ता. राहाता) येथील दोघांचा समावेश असून ते लासलगावी अंत्यविधीसाठी आले होते.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपेरिक्षा क्रमांक एमएच १५, वाय ४४६१ मध्ये रिक्षाचालकासह पाच जण प्रवास करत होते. त्याच सुमारास विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक सुहास मनोहर निकाळे (४०, विंचूर), विठ्ठल बाजीराव भापकर (६५, लोनी प्रवरा), भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (६०, लोणी प्रवरा), किसनदास बैरागी (६०, धारणगाव खडक), रतन पवार (४०, इंदिरा नगर, विंचूर) यांचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त पाचही जणांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित घोंगडे यांनी तपासणी केली असता चार जण मृतावस्थेत आढळून आले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉ. सुजित गुंजाळ आणि डॉ. विलास कांगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी मदत केली.

अंत्यविधी बेतला जीवावरअपघातातील दोघे विठ्ठल बाजीराव भापकर व भाऊसाहेब बाळासाहेब नागरे हे दोन प्रवासी लोणी प्रवरा येथून लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंत्यविधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात