शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’ समिती सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिलेला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:46 IST

नाशिक महापालिका : भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडकेंना उमेदवारी

ठळक मुद्दे विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक - महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरूवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे, दोन महिलांमध्ये सरळ सामना होणार असला तरी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड निश्चित आहे.स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी येत्या शनिवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, सत्ताधारी भाजपाकडून प्रभाग ७ मधील नगरसेवक हिमगौरी अहेर-आडके यांनी नगरसचिव राजेंद्र गोसावी यांच्याकडे सादर केला. हिमगौरी अहेर यांनी तीन अर्ज दाखल केले. सूचक-अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर महापौर रंजना भानसी, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर, शांता हिरे, गणेश गिते, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील यांच्या स्वाक्षºया आहेत. अहेर यांचा अर्ज दाखल करण्यात आला,त्याप्रसंगी महापौरांसह उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप आदी उपस्थित होते. त्यापूर्वी, विरोधकांच्यावतीने शिवसेनेच्या संगीता अमोल जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. जाधव यांचे दोन अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून कॉँग्रेसचे समीर कांबळे व सेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व संतोष साळवे यांच्या स्वाक्ष-या आहेत. जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला, त्याप्रसंगी विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार आदी उपस्थित होते. स्थायी समितीवर भाजपा ९, शिवसेना ४, कॉँगे्रेस १, राष्टवादी १ आणि मनसेच्या कोट्यातील अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. येत्या शनिवारी (दि.१७) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक