शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर ‘त्या’ रोहित्राची पाहणी

By admin | Updated: August 20, 2014 00:41 IST

तीन दिवसांनंतर जाग : ‘महावितरण’ची उदासीनता

नाशिक : गेल्या रविवारी रात्री बडी दर्गा शरीफच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या विद्युत रोहित्राच्या झटक्याने एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऊर्जा व सम विभागाचे सहायक विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.बडी दर्गाच्या प्रांगणात असलेले रोहित्र सुरक्षित करण्याच्या सूचना शासकीय सहायक विद्युत निरीक्षक संदीप महाजन यांनी महावितरण कंपनीला दिल्या आहेत. पोलिसांकडून पंचनामा अहवाल, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर निरीक्षण अहवाल महावितरणकडे सोपविला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. किमान पंधरा दिवसांचा कालावधी अंतिम अहवालासाठी लागणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सदर रोहित्र सुरक्षित करण्याबाबतच्या सूचना महावितरणला त्यांनी दिल्या असून, त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रतन सोनुले यांनी सांगितले. तातडीने येथील विद्युत रोहित्र सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)