आखाड्यांचे ध्वजारोहण जनतेचा सोहळा

By Admin | Updated: August 17, 2015 23:47 IST2015-08-17T23:47:07+5:302015-08-17T23:47:49+5:30

ग्यानदास महाराज : अडवणूक न करण्याचे पोलिसांना आवाहन

Festival of hoops for the masses | आखाड्यांचे ध्वजारोहण जनतेचा सोहळा

आखाड्यांचे ध्वजारोहण जनतेचा सोहळा

नाशिक : साधुग्राममध्ये येत्या बुधवारी (दि.१९) होणारे आखाड्यांचे धर्मध्वजारोहण हा जनतेचा सोहळा असून, पोलिसांनी कोणाचीही अडवणूक करू नये, असे आवाहन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केले आहे. दरम्यान, धर्मध्वजारोहण सोहळा हा नाशिककरांचा उत्सव असून, सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी होणाऱ्या आखाड्यांच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासंबंधी माहिती देण्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत ग्यानदास यांनी सांगितले, साधूंना कोणताही पक्ष नसतो. त्यामुळे आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याला सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रारंभ होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी महापालिकेने उचलली असून, तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. सकाळी ७ वाजेपासूनच ध्वजपूजा व इष्टदेवता पूजेस प्रारंभ होणार आहे.

Web Title: Festival of hoops for the masses