शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२०० शेतकऱ्यांचे शेतातच उपोषण

By admin | Updated: August 25, 2016 23:50 IST

नुकसानभरपाईची मागणी : १५ दिवसात निर्णयाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

पिंपळगाव बसवंत : आधी अस्मानी संकट आणि नंतर सुलतानी संकट पाचविला पुजलेले असताना पॉवरग्रिड कार्पोरेशनच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असून, कंपनी विरोधात सुमारे २०० शेतकऱ्यांनी शिरवाडे वणी येथे शेतातच उपोषण सुरू केले.पॉवरग्रिड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे औरंगाबाद - बोईसर ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनीची मनोरे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, येवला या तालुक्यातून विद्युत मार्ग जात असून, काम सुरू करण्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने व अगदीच तुटपुंजी मदत जाहीर केल्याने बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. उपोषणात महिलाही सहभागी झाल्या आहेत. सदर शेतात सकाळपासूनच तहसीलदार विकास भांबरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व मोठा पोलीस ताफा हजर असून, या पॉवरग्रिड व शासनाचा कृषी विभाग यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने अखेर उपोषण व आत्मदहनाचा मार्ग अवलंबला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विद्युत वाहिनीच्या कामासाठी मनोरे उभे करताना महसूल अधिकाऱ्यांनी द्राक्ष झाडांच्या मालाची किंमत प्रति ७३.८० किलोचा दर ठरवून दिली होती. आता कपात करून तो दर अवघा १२ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने मूल्यांकन केले. बागासाठी आलेला खर्च तसेच जमिनीचा मोबदला आदि नुकसानभरपाई याचा कुठलाही विषय नाही अथवा नुकसानभरपाई नाही. केवळ दबाव यंत्रणेचा वापर करून मनोऱ्याचे काम करू पहात आहे. या मनोऱ्यासाठी तारा ओढण्यासाठीसुद्धा अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे वाहनांसाठी काढावे लागणार आहे. त्यांचा तर कुठलाही हिशेबच नाही. कंपनी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांची मनमानी व दिलेले आश्वासन न पाळल्याने अखेर बाधित शेतकरी एकवटला गेला असून, या विरोधात आता उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून, या उपोषणात राजेंद्र कावळे, शेख, शिवाजी हांडगे, रामभाऊ जाधव, दत्तात्रय कतोरे, सुनील निफाडे, देवा काजळे, मुरलीधर संधान, रघुनाथ निफाडे, ज्ञानेश्वर गवांदे, नामदेव जाधव, संजय पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पवार, राहुल पाटील, बाळासाहेब गवांदे आदि शेतकरी व महिला सहभागी झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)