शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणात उपोषण

By admin | Updated: June 24, 2014 00:37 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी वाचविण्यासाठी सोनेवाडी ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि.२३) भोजापूर धरणातील देवांशीबाबा मंदिराजवळ उपोषणास प्रारंभ केला आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी वाचविण्यासाठी सोनेवाडी ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि.२३) भोजापूर धरणातील देवांशीबाबा मंदिराजवळ उपोषणास प्रारंभ केला आहे. परिसरातील नांदूरशिंगोटे, दोडी, कणकोरी, मानोरी आदि गावांतील ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.सोमवारी सोनेवाडी गावातून फेरी काढून धरणातील मोकळ्या जागेवर उपोषणास बसले. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. भोजापूर धरणातील बेकायदेशीर खोदलेल्या विहिरी त्वरित बुजविण्यात याव्यात, बेकायदेशीर वीजजोडणी तत्काळ खंडित करण्यात यावी, धरणातून अवैध जलवाहिनीद्वारे पाणीचोरी करणाऱ्यांवर तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी सकाळी ११ वाजता उपोषणास प्रारंभ झाला. या प्रसंगी सरपंच प्रमिला सहाणे यांनी सोनेवाडी येथील ३६५ हेक्टर जमीन भोजापूर धरणासाठी संपादित करण्यात आली आहे. परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना या धरणाचा काहीही उपयोग झाला नाही. गेल्या तीन ते चार वर्षात धरणाच्या क्षेत्रात गुंठाभर जमीन घेऊन तेथे विहीर खोदून त्यातील पाणी सुमारे १५ किलोमीटरपर्यंत नेण्यात आले आहे. काही लोकांनी खासगी कंपन्यांना पाणी दिले आहे. पाणीप्रश्नासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासमवेत ग्रामस्थांच्या दोन वेळेस बैठका घेतल्या. त्यावेळी पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीला आदेश देऊनही त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झाली नाही. याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठक होऊनही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल व वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी आनंदराव शेळके, संजय शेळके, सरपंच एकनाथ आव्हाड, गणपत केदार यांची भाषणे झाली. या उपोषणास त्र्यंबक गोसावी, लहानू सहाणे, गजानन रावले, विक्रम देशमुख, कैलास रावले, सचिन सहाणे, सौैरभ देशमुख, सुभाष सहाणे, शरद देशमुख, भागवत सहाणे, बाळू पवार, प्रमोद रावले, अशोक सहाणे, योगेश परदेशी, रामनाथ मेंगाळ, विनोद देशमुख, संतोष आदमे, अहमद शेख, विशाल जगताप आदिंसह शेकडो ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)