शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची जुनी कर्जे गोठवून नवीन कर्र्ज द्यावीत

By admin | Updated: May 15, 2016 22:36 IST

सदाभाऊ खोत : दुष्काळग्रस्तांशी साधला संवाद

 पांगरी : सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची जूनी कर्जे गोठवून त्यांना नवीन कर्ज द्यावे व पाच वर्षांनी समान हप्त्यांत कर्जाची वसुली करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूरहून नाशिक येथे जात असताना खोत यांनी पांगरी येथे धावती भेट दिली. येथील साईबाबा मंदिराजवळ बैठक घेऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शंभर टक्के कर्जमाफी आणि कांदा व दुधाला हमीभाव या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. शंभर टक्के कर्जमाफी नाही मिळाली तरी किमान दहा वर्षे बिगर व्याजी कर्ज मिळाले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. विजय मल्ल्यांसारखे उद्योगपती कर्ज घेऊन सहजपणे देश सोडतात. मात्र, शेतकऱ्यांना कर्जासाठी थेट जग सोडण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याचे खोत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बी-बियाणे, शेतीची अवजारे, बैल सरकारी खजिन्यातून दिली होती. त्यामुळेच स्वराज्य भक्कमपणे उभे राहिले. शिवरायांनी शेतकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानले होते. आत्ताच्या राज्यकर्त्यांनीही त्याच पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे खोत म्हणाले. दुधाच्या उत्पादनात ५० टक्के भेसळ होत असल्यानेच भावात घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने भेसळखोरांना लगाम घातल्यास भाव वाढणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय दुधाचा दर्जा तयार करून बाजारातील इतर उत्पादनांशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे खोत यांनी सांगितले. शांताराम पगार, संजय वारुळे यांच्या हस्ते खोत यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रवि पगार, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, आत्माराम पगार, विश्वनाथ पगार, कृष्णा घुमरे, सोमनाथ पगार, संदीप शिंदे, सुभाष पगार, धनंजय निरगुडे, नीलेश पगार, बाजीराव कांडेकर, संजय पगार, रभाजी पगार, प्रदीप तनपुरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)