शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वीज बिलांमुळे शेतकऱ्यांचे कनेक्शन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

निफाड : तालुक्यात अनेक ठिकाणी थकीत वीज बिलअभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत ...

निफाड : तालुक्यात अनेक ठिकाणी थकीत वीज बिलअभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून महावितरण कंपनीने सक्तीच्या वीज बिल वसुलीला वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी नाशिक येथील वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या कार्यालयात माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे केल्या.

निफाड तालुक्यात सर्वत्र विजेच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी थकीत वीज बिलअभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे तसेच ज्या लोकांनी ८० टक्के वीज बिलांचा भरणा केला आहे. त्यांचेदेखील वीज कनेक्शन कट केले जात आहे. वारंवार जंप तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, ट्रान्सफाॅर्मरची क्वॉईल जाणे, तार तुटणे अशा वीज समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत नागरिकांना अर्ज करूनही फिडर बदलून मिळत नाही तसेच महावितरण विभागांकडून चालू असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीला वाढीव मुदत मिळावी याकरिता कदम यांनी कुमठेकर यांच्याकडे मागणी केली. या मागण्यांबाबत लवकर कार्यवाही केली न केल्यास आंदोलनांचा इशारा कदम यांनी दिला. यावेळी कुमठेकर म्हणाले की सक्तीच्या वसुलीसंदर्भात ऊर्जा विभागाचे स्पष्ट निर्देश असून थकबाकीत प्रचंड वाढ झाल्याने वीज वितरण कंपनी तोट्यात आली आहे. त्यामुळे पर्यायाने वसुली करावी लागत असून शेतकऱ्यांनी व स्ट्रीट लाईटबाबत ग्रामपंचायतींनी किमान चालू बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही केले. बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, गोकुळ गीते, शंकर संगमनेरे, संजय दाते, तानाजी पूरकर, बाबाजी कुशारे, योगेश कुयटे, आमोल जाधव, देवेंद्र काजळे, पोपट पाटील, अरुण डांगळे, छोटू साळे, प्रकाश वाटपाडे, किरण सानप, दशरथ रुमणे,भाऊसाहेब कमानकर, भाऊसाहेब खालकर, शरद खालकर, सरपंच भगवान चव्हाण उपस्थित होते.

------------

निफाड तालुक्यातील वीज समस्यांबाबत मुख्य अभियंता कुमठेकर यांना निवेदन देताना अनिल कदमसमवेत शेतकरी. (२७ निफाड)

270821\27nsk_48_27082021_13.jpg

२७ निफाड